धाराशिव : येडशी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित उच्च माध्यमिक गटाच्या स्पर्धा शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेत येडशी येथील जनता विद्यालय उच्च माध्यमिक विभागाने संपूर्ण स्पर्धेत आपली छाप उमटवली.
संपूर्ण संस्था स्तरावर घेतले गेलेल्या या स्पर्धेत वक्तृत्व स्पर्धेत विद्यालयाची विद्यार्थिनी कु.सुप्रिया सोमनाथ नलावडे हीने तृतीय क्रमांक पटकावला तर,
वैयक्तिक गायन स्पर्धेत कु.श्रुती संताजी जाधव या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवला.तर समूह गायन स्पर्धेत विद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.या संघाला विज्ञान विभाग प्रमुख प्रा.श्रीमती तांबे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. वक्तृत्व स्पर्धेसाठी कला विभाग प्रमुख प्रा.श्रीमती विद्या देशमुख यांनी मार्गदर्शन केले.सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्था पदाधिकारी,शाळा समिती अध्यक्ष, प्राचार्य चंद्रकांत नलावडे, उपप्राचार्य कांबळे सर, पर्यवेक्षक श्री चव्हाण सर व ग्रामस्थांनी केले.
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी धाराशिव
मो.9922764189