सचिन बिद्री :उमरगा
विद्यार्थ्यानी आपल्या महाविद्यालयीन जीवनात करिअरचे स्वप्न पाहताना आपल्या वेळेचे आणि उपलब्ध साधनांचे नियोजन करावे. मोबाईल वापरताना काय घ्यावे आणि कसे घ्यावे याचेही नियोजन असावं.करिअर कट्टाचे सर्व उपक्रम नियमित तीन ते साडेतीन तास आपल्या मोबाईल वर घेताना IAS आपल्या भेटीला आणि स्पर्धा परीक्षा तयारी, तसेच उद्योजक आपल्या भेटीला, प्रत्येक महिन्याचे तीन सर्टिफिकेट कोर्स अणि इतर कौशल्य विकास,मूल्य,संस्कार रुजवनारे उपक्रम विद्यार्थ्याचे करिअर घडविण्यास उपयुक्त आहेत. विद्यार्थ्यानी त्याचा स्मार्ट वापर केला तर स्मार्ट करिअर घडेल असे प्रतिपादन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा डॉ यशवंत शितोळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग,महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत एक दिवसीय विद्यार्थी संवाद कार्यशाळा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील छ. शिवाजी महाविद्यालयात संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ शितोळे यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
छ.संभाजीनगर विभागाचा करिअर कट्टा विद्यार्थी संवाद कार्यशाळेचा समारोप उमरगा येथील सेंटर ऑफ एक्सेलन्स महाविद्यालय श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात झाला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा जिल्हा समन्वयक डॉ संजय अस्वले, नियामक मंडळ सदस्य प्राचार्य डॉ गुलाब राठोड, डॉ जी एच जाधव, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे,डॉ पी ए पिठले,उमरगा तालुका समन्वयक डॉ प्रशांत मोटे, लोहारा तालुका समन्वयक डॉ किरण लोमटे, तुळजापूर तालुका समन्वयक डॉ एम बी बिरादार, विविध तालुक्यातील महाविद्यालयीन समन्वयक डॉ एस पी पसरकले, डॉ ए के कटके, डॉ राम सोलनकर, सोमवंशी , डॉ एस डी कांबळे, डॉ ए सी पाटील, डॉ नागेश कांबळे, अमित रेड्डी डॉ इनामदार, डॉ शेख डॉ हिस्सल आदींची उपस्थिती होती.या कार्यशाळेस उमरगा,लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी संसदेचे 30 सदस्य तीन तालुक्यातील विद्यार्थी संसदेचे 45 आणि इतर 240 विद्यार्थी असे एकूण 315 विद्यार्थी आणि 40 प्राध्यापक उपस्थित होते.
सूत्रसंचालन आणि स्वागत गीत विद्यार्थी संसदेच्या सदस्यांनी केले.
आभार डॉ एस पी पसरकले यानी केले.