AJIT PAWAR | ग्रामीण भागातील जीवन वाहिनी असलेल्या लाल परीची अर्थात एसटीची भाडेवाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची २७६ वी बैठक परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव , राज्य परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकील राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतुक) आणि परिवहन आयुक्त देखील उपस्थित होते. या बैठकीत एसटीची १४.९५ टक्के भाडे वाढ करण्यास मंजूरी मिळाली आहे. मात्र आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्यानंतर एसटीच्या तिकीट दारात वाढ झाली का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
एसटीच्या संभाव्य भाडेवाढ बाबत देखील अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन चांगली सुविधा शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना द्यायची आहे. अशी चर्चा सुरू आहे मात्र अंतिम निर्णय अजून झालेला नाही. कारण मुख्यमंत्री पहाटेच परदेशातून आलेले आहेत. हे महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच घ्यायचे असतात. त्यामुळे त्यांना विचारून पुढचा निर्णय घेण्यात येईल. शेवटी महामंडळ पण व्यवस्थित चाललं पाहिजे आणि जनतेला पण त्रास कमी झाला पाहिजे. असा मध्यमार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
#ajitpawar #STbus #bus #STbusticket