प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संघर्ष मित्र मंडळातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शेकडो टू व्हीलर गाड्या व कळमनुरीतील नागरिक उपस्थित होते,

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संघर्ष मित्र मंडळातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. संघर्ष मित्र मंडळातर्फे कळमनुरी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात तिरंगा रॅली हे प्रमुख उपक्रम आहे,

यानिमित्त सामाजिक उपक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना प्रभात फेरीमध्ये खाऊ वाटप,मूकबधिर गतिमंद विद्यार्थ्यांना फळवाटप, व्यसनमुक्ती कार्यक्रम तसेच युवा पिढी तंदुरुस्त आणि सुदृढ राहावी म्हणून संघर्ष मित्र मंडळ व्यायाम शाळा देखील आहे, यासारखे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम संघर्ष मित्र मंडळातर्फे आयोजन करण्यात येते. यावेळी संघर्ष मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ॲड विश्वनाथ चौधरी पाटील, शिवराज पाटील, शिवसेना शहरप्रमुख बबलू भैया पत्की, आर आर पाटील, राजू अण्णा पटणे, मयूर शिंदे, विकास सदावर्ते, शिवा भुसारे, आजीज पठाण, सतीश खर्जुले, संदीप मोरे, आयाज पठाण, बंटी चवात, बबलू पंचलिंगे, गोवर्धन पाटील, भैय्या पत्रे, मंगेश थळपते, ओमकार थळपते, सचिन व्यवहारे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
