
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील सुतारकाम करून गरीब परिस्थितीत आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणारे शेख युसुफ शेख अजीज यांचा मुलगा शेख सोहेल याने नीट परीक्षेत 720 पैकी 542 गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळवले. त्याच्या या यशाबद्दल कळमनुरी येथील खासदार हेमंत पाटील यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शेख सोहेलचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी, दैनिक भास्कर तालुका प्रतिनिधी शेख वाजेद, जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते मारोतराव खांडेकर, हिंगोली जनसंपर्क अधिकारी गजानन थळपते, कळमनुरी जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक उपस्थित होते.