हिंगोली : महाराष्ट्र काॅग्रेस O.B.C सेल जिल्हाध्यक्ष तथा विद्या शक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांचे चिरंजीव अभिषेक भैय्या भास्करराव बेगांळ हे हिंगोली व सेनगाव मधुन महाराष्ट्र युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत तर महाराष्ट्र युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष म्हणून मा.शिक्षण सभापती संजय भैया देशमुख यांचे चिरंजीव यश देशमुख हे निवडणूक लढवित आहे.
हिगोली जिल्ह्यातील आणि सेनगाव तालुक्यामधील 18 ते 35 वयोगटातील सर्व तरुणांनी दि.12 नोव्हेंबर ते 11डिसेबर पर्यंत मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, महाराष्ट्र काॅग्रेस O.B.C सेलचे जिल्हाध्यक्ष भास्करराव बेंगाळ आणि संजय भैया देशमुख,संजय पाटील गोरेगावकर काॅग्रेसच्या पदाधीकाऱ्यानी केले आहे.