केंद्र व राज्य स्तरांवर मदती साठी प्रयत्नशील राहण्याचे दिले आश्वासन

पालघर : गुजरात राज्यातील जलपरी या मासेमारी बोटीवर पाकिस्तान च्या मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सी कडून झालेल्या गोळीबारात पालघर येथील वडराई गावांतील श्रीधर चामरे या खलाशी युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत आणखी 2 जण गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान या घटनेचा तीव्र निषेध करीत पालघर चे आमदार श्रीनिवास वनगा यांनी सोमवारी वडराई येथे मृत श्रीधर चामरे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.तसेच राज्य व केंद्र स्तरांवर चामरे परिवारास मदद मिळण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.याप्रकरणी तात्काळ केंद्र व राज्य शासनाने आपत्ती व मदद, पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून मदद मिळण्यासाठी मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज्याचे मदद व पुनर्वसन मंत्री मा.श्री.विजय वडेट्टीवार यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.तसेच पालघर चे जिल्हाधिकारी यांना देखील पालघर जिल्हा आपत्ती मदद व पुनर्वसन मदद निधीतून तात्काळ मदद देण्याची मागणी केली आहे.
यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ.ज्योतिताई मेहेर, शिवसेना तालुकाप्रमुख श्री.विकास मोरे,वडराई मच्छीमार सोसायटीचे चेअरमन श्री.मानवेंद्र आरेकर आदी सह उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *