पालघर : ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईस युनियन वर्ग 3 च्या पालघर विभागाच्या द्विवार्षिक तृतीय अधिवेशनचे प्रमुख पाहुणे पालघरचे खासदार राजेंद्र गावित ह्यांनी पालघर पोस्ट कार्यालय व कर्मचारी वर्ग 3 च्या प्रश्न जाणून घेतले. पोस्ट ऑफिस, दूरसंचार निगम, एयर इंडिया इ. ह्या सारख्या विभागांची अवस्था ही ब्रिटिश कालीन इस्ट इंडिया कंपनी सारखी झाली आहे. अदानी इंडिया, अंबानी इंडिया ह्या सारख्या व्यापारी कंपन्या उद्या राजकर्त्या बनतील अशी खंत खासदार गवितांनी व्यक्त केली.

पालघर विभागाच्या पोस्ट कार्यालय करिता नव नगर येथे पोस्ट कार्यालय व पास पोर्ट कार्यालय इमारत करिता प्रयत्न करणार असे ही ते ह्या वेळी म्हणाले. केंद्र सरकारी कर्मचारी वर्ग 3 ची पेन्शन स्कीम, लो पेन्शन स्कीम ह्या संदर्भात केंद्रीय संसदीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असेही ते ह्या वेळी म्हणाले. ऑल इंडिया पोस्टल कर्मचारी वर्ग 3 च्या तृतीय अधिवेशनाच्या वेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, पोस्टल इंडिया कर्मचारी वर्ग 3 चे सचिव सुरेंद्र पालव, नवी मुंबई रिजनचे सचिव गुरुदत्त आळवे, मुंबई पोस्टलचे सचिव महेश सावंत, विकास भोईर, इ मान्यवर उपस्थित होते.