पालघर मधील डहाणू येथील हिट अँड रन प्रकरणातील डहाणू पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांचं निलंबन करण्यात आलं आहे ,डहाणू येथील चिंचणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मध्ये खरमाटे यांच्या गाडीनं दुचाकीला धडक दिली होती यात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले होते.

जखमींवर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेनंतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटेंवर कारवाई करण्यात आली आहे.
