सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात

पालघर : डहाणू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने भरधाव गाडी चालवून काही पादचाऱ्यांना उडविल्याची घटना समोर आली असून,,त्यातील एकाची प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्या व्यक्तीला नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे,,,,चिंचणी ते डहाणू आपल्या खाजगी गाडीने प्रवास करताना ही घटना घडली आहे,, सदरची गाडीही डहाणू पोलीस पोलीस स्टेशनच्या आवारात पार्क केली गेली,,, विशेष म्हणजे या गाडीमध्ये पोलिसांची टोपी असल्याने एकच खळबळ उडाली असून,,, अशी अपघातग्रस्त गाडी डहाणू पोलीस स्टेशन च्या आवारा गेल्याने डहाणू पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी जमली जमून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे,सदरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नशे मध्ये गाडी चालवत असल्याचे बोलले जात असून तीन चाकांवरच गाडी चालवत असल्याचे डी.वाय.एस.पी.यांनी सांगितले

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात कलम 279,337,338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,,ते स्वतःच गाडी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे,,तर त्यांची मेडिकल ही करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाणगाव पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

प्रतिनिधी,
प्रवीण बाबरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *