पालघर : तलासरीमधील नागरिकांच्या हितासाठी श्री. निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र मार्फत आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले.

संपूर्ण देशाचा पोशिंदा असणाऱ्या कष्टाळू बळीराजाला जिजाऊ संस्था सदैव पाठबळ देते. म्हणूनच, तलासरी तालुक्यातील तब्बल ३०० शेतकऱ्यांना गवार बियाण्यांचे वाटप करून त्यांना पाठिंबा देण्यात आला. केवळ बियाणे देऊन जिजाऊ संस्था समाजकार्य थांबवणार नसून, शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देत, त्यांना सक्षम करून त्यांचे राहणीमान उंचावण्याकडे विशेषतः लक्ष दिले जाणार आहे.

तलासरी तालुक्यातील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी, श्री. निलेशजी सांबरे साहेबांची कन्या कु. तेजस्विनी निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा २ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये उत्तम कलागुणांचे प्रदर्शन केलेल्या विजेत्यांचा गौरव व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास मा. श्री. निलेश भगवान सांबरे (अध्यक्ष -जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र ) मा. श्री. सुधीर ओझरे (समाज सेवक) मा. श्री. देवानंद शिंगडे (जि. प. सदस्य पालघर ) मा. श्री. कल्पेश भावर(जिजाऊ सदस्य डहाणू )
मा. श्री. संदेश पाटील(जिजाऊ सदस्य डहाणू ) मा. श्री. वनशा दुमाडा (मा. पं. स. सभापती ) मा. श्री. राहुल म्हात्रे( गटविकास विकास अधिकारी )
मा. श्री. जावेद खान (जिजाऊ संस्था जिल्हा प्रमुख ) मा. श्री प्रताप धोडी (समाज सेवक डहाणू ) मा. श्री. वाघात सर (केंद्र प्रमुख गिरगांव )
मा. श्री. संजय प्रधान (केंद्र प्रमुख झरी ) मा. श्री. प्रकाश बोबा (कुर्झे शेतकरी ) मा. श्री. अमित आडगा
मा. श्री. सुबोध ओझरे मा. श्री. हेमांगी ताई , मा. श्री. विजय माळी (समाज सेवक तलासरी ) एवढेच नाही तर, तलासरी तालुक्यातील जनतेला सर्व शासकीय योजनांची माहिती मिळावी व त्यांचा लाभ सर्वांना घेता यावा, तसेच उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, निराधार पेन्शन योजना, पॅनकार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड व महत्वाच्या अतिरिक्त दाखल्यांची सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उभारण्यात आलेल्या जिजाऊ जनसेवा कार्यालय, तलासरी केंद्राचा उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

तलासरीकरांसाठी विविध स्तरावर जनकल्याणाचे उपक्रम राबविल्याबद्दल जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि श्री. निलेश सांबरे यांची प्रशंसा स्थानिकांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *