जिल्हाधिकारी आमच ऐकत नाही त्यामुळे आता आम्ही जीव देऊ का ?असं अजब उत्तर पालघर चे भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी शेतकरी आणि पत्रकारांना दिल .
ठाकरे सरकार विरोधात आज भाजपकडून ठीकठिकाणी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदा घेण्यात आल्या . पालघर मध्ये डहाणू येथे आमदार मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि पत्रकार यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा तसच ठाकरे सरकार विरोधात अनेक वक्तव्य करण्यात आली . सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकऱ्यांची दिवाळीही काळी होणार असून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची दिवाळी काळी करा असं आवाहन यावेळी भाजपच्या नेत्या मनीषा चौधरी यांनी केला . मात्र सरकार कमी पडत असेल तर तुम्ही विरोधक ही कमी पडत आहेत असं एका शेतकऱ्याने सांगितल्यावर जिल्हाधिकारी आमचं काहीच ऐकत नाही त्यामुळे आता आम्ही काय जीव देऊ का ? असा अजब प्रश्नच भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी या शेतकऱ्यांसमोर उपस्थित केला . त्यामुळे या वक्तव्याचा विरोधकही समाचार घेत असून जिल्ह्यात सध्या नंदकुमार पाटील यांच्या या बेजबाबदार वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे .
प्रतिनिधी प्रवीण बाबरे