जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यावसायिकांवर कारवाई सुरू

हिंगोली : जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू असुन दि 20 नोव्हेंबर रोजी सेनगाव शहरातील वरुडचक्रपान पाटी जवळील साई मंदिरा लगतच्या मोकळ्या जागेत आरोपी हा बेकायदेशीररित्या मिलन नावाचा मटका जुगार चालवत होता याची माहिती सेनगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार रंजित भोईटे यांच्या पथकाने छापा टाकून मटका जुगार चालकांवर कारवाई करण्यात आली असुन त्यांच्याकडुन एक मोटर सायकल, मोबाईल,6हजार 690 नगदी रोख रक्कम असा एकूण 61 हजार 690 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पो. हे. काॅ.चव्हाण हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *