AHILYANAGAR | जामखेड महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ सुनिल पुराणे यांची संस्थेने नियुक्ती केली या बद्दल जामखेड येथील काका ग्रुप च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे
डॉ. सुनील जी. पुराणे हे 1991 पासून जामखेड महाविद्यालयात गणित विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यांनी पुणे विद्यापीठा मधून एम.एससी. व पीएच.डी. प्राप्त केलेली आहे तसेच 2008 मध्ये एम. फिल. प्राप्त केली आहे.
महाविद्यालयामध्ये त्यांनी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी विकास अधिकारी, नॅक समन्वयक, पुणे विद्यापीठाच्या गणित बोर्डात अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून 2018 ते 2023 पर्यंत काम पाहिले आहे. नेहमीच विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या विकासामध्ये त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. महाविद्यालयामध्ये अनेक वृक्षारोपन करून महाविद्यालयाचा परिसर हिरवागार केला आहे.
नुकतीच संस्थेने त्यांना प्रभारी प्राचार्य पदाचे जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नॅक मध्ये ए ग्रेड, तसेच महाविद्यालयात नवीन पदवीत्तर स्तरावरती विषय सुरू करणे, क्रीडांगण अत्याधुनिक करणे, ग्रंथालयाची भव्य इमारत उभारणी करण्यासाठी प्रयत्नशील असतील.
तसेच जामखेड पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर न जाता आपल्याच महाविद्यालयामध्ये कसे येतील यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रयत्न करणार आहेत.
यावेळी काका ग्रुप चे वसंतराव राळेभात माजी प्राचार्य अविनाश फलके डॉ सुनिल नरके विनफिन गुरूकुलम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे संचालक प्रा बाळासाहेब पुराणे जेष्ठ नागरिक संघाचे तालुकाअध्यक्ष तुकाराम अंदुरे राजमुद्रा ग्रुप चे अध्यक्ष सोमनाथ तनपुरे श्री. साई स्टोन क्रेशरचे संचालक राजेंद्र शिरोळे, बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखाधिकारी सचिन लोहकरे माजी तहसीलदार राजेंद्र दराडे सिव्हिल इंजिनिअर संतोष बोबडे प्रा केशव कोल्हे नामदेव भोसले अच्युत शिंदे विजय डोंगरे पञकार मिठूलाल नवलाखा, पञकार बाळासाहेब वराट भगवान समुद्र, दिपक ढवळे संभाजी खोटे आदी उपस्थित होते
चौकट
काका ग्रुप सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आहे वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान शासकीय विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव व गरजु विद्यार्थ्यांना मदत असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात
विशेष म्हणजे काका ग्रुप मधील प्रा. अविनाश फलके, डॉ. सुनिल नरके आणि आता डॉ. सुनिल पुराणे असे तीन जणांची प्राचार्य पदी निवड करण्यात आली आहे या बद्दल काका ग्रुपने दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळाचे आभार मानले आहे.
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124