(धाराशिव:लोहारा)
भारतीय जनता पार्टी लोहारा तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील अचलेर येथील राजेंद्र पाटील यांची निवड झाल्याबद्दल लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.15 जुलै रोजी भाजपा व मिलाप मित्र मंडळाच्या वतीने फटाके फोडुन जल्लोष साजरा करण्यात आला. धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील व माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड जाहीर करण्यात आली आहे, यावेळी भाजपा माजी तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, माजी तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, माजी तालुका उपाध्यक्ष संजय कदम, मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला, सतिश गिरी, प्राचार्य शहाजी जाधव, शिवा थोरात, बलभीम पाटील, अॅड. रविकांत भोंडवे, अदि उपस्थित होते. भाजपा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातुन सर्व स्तरातुन राजेंद्र पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.