धाराशिव:लोहारा

लोहारा तालुक्यातील माकणी येथील अंजुम कौसरबी अब्दुलअजिज सय्यद यांनी विश्‍वकर्मा विद्यापीठ, पुणे येथुन एल.एल.बी.(कायदा) पदवी अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम परीक्षेत ८ SGPA मिळवुन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल लोहारा शहरात दि.12 जुलै रोजी मिलाप मित्र मंडळ व मित्र परिवाराच्या वतीने यथोचित सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपनगराध्यक्ष हाजी अमिन सुंबेकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, नगरसेवक गौस मोमिन, माजी नगरसेवक आयुब शेख, मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप, मेडीकल असोशिएन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरी लोखंडे, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, पत्रकार बालाजी बिराजदार, माजी नगरसेवक श्रीनिवास माऴी, कॉग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान, कॉग्रेसचे तालुका सरचिटणीस ईस्माईल मुल्ला, नयुम सवार, महम्मद नागुरे, महमहद सुंबेकर, बसवराज पाटील, अब्दुलअजिज सय्यद, आश्पाक सय्यद, बंडु वैरागकर, खाशिम मुल्ला, अस्लम आत्तार, अदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *