नॅशनल लेव्हल कॉम्पीटीशन इन्पायर ॲबॅकस ॲड वेदीक मॅथ ॲकेडमीचा जामखेड मध्ये विद्यार्थासाठी उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न

जामखेड शहरात पार पडली राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा; देशभरातून 983 विद्यार्थ्यांचा सहभाग
झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन
जामखेड – झपाट्याने गणिती उदाहरणं सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देणारी राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा रविवार दिनांक 03 ऑगस्ट 2025 रोजी जामखेउ शहरात उत्साहात पार पडली. ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून तब्बल 983 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली बौद्धिक क्षमता सादर केली.
ही स्पर्धा जामखेडमधील साईबन मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी अवघ्या पाच मिनिटांमध्ये मोठमोठी गणिती उदाहरणे अचूकपणे सोडवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय कार्यकारिणी, जैन कॉन्फरन्स, दिल्ली चे सदस्य संजय कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी बोलताना संजय कोठारी म्हणाले की, “अबॅकस शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती, मानसिक गणित कौशल्य वाढते आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागतो. अबॅकस मुळे मुलांच्या बौध्दिक क्षमतेत वाढ होते. त्याचप्रमाणे शालेय अभ्यासात गणित विषय सोपा वाटण्यासाठी अबॅकस एक उपयुक्त माध्यम ठरत आहे.” त्यांनी इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी च्या कार्याची स्तुती केली.


या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेले अर्णव क्षीरसागर, अक्षरा आंधळे, देवेंद्र घावणे, संस्कार मुळे या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी विश्वजीत भवर, पुजा राऊत, शौर्य शिंदे, संस्कृती अवसारे, सायली कुमटकर, माधवी वराट, शौर्य भोंडवे, श्रेया भोंडवे, श्रृतीका बहीर, श्रेयस गवळी, तनुजा राख, स्वराज राळेभात, आशिर्वाद पवार, अबोली पवार, आयुष बोधले, अभय जाधव, श्रेयसी भोसले, यशश्री माकने, कार्तिक तळेकर, आनंदी भोंडवे, आदित्य तिकटे, साई फाळके, कल्याणी बोराडे, पंकजा आंधळे, सिध्दी कुटे या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
अकॅडमीत उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या अल्का खताळ, दिपाली मुळे या शिक्षिकांना स्टार टिचर अवार्ड व पल्लवी सानप, पायल तंटक, प्रितम सोंडगे व राजश्री टकले या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समिती माजी उपसभापती गोपाळभाऊ रकटाटे, श्रीगोंदा माजी कृषी अधिकारी बलभिम शेळके, बाबासाहेब शेकडे, बबनराव मोरे, मधुकर (आबा) राळेभात, अमित चिंतामणी, शांतीलाल आजबे, महादेव मोरे, नारायण राऊत, नंदकुमार गव्हाणे, शारदा कुटे, राजश्री मोरे, उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, अर्चनाताई राळेभात, नामदेव पाटील वाळके, संतोष बनकर, कांतीलाल गव्हाणे, प्रमोद राऊत, लक्ष्मण भोरे, अमोल राळेभात, धनश्री भोगील, सुरेश मोहिते, मारुती पठाडे, मिना राळेभात, पल्लवी सुर्यवंशी, प्रियंका चौरे, लक्ष्मण गर्जे, अनिल लष्कर, रघुनाथ मुटकुळे, भारत काळे, संदिप ठोंबरे, महेश वारे, प्रविण ऊगले, कृष्णा पवार, रामदास गंभीरे, रामदास बांगर आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक रविंद्र रकटाटे व सर्व ‍शिक्षकांनी कठोर परीश्रम घेतले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अकॅडमीची व स्पर्धेची माहिती दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार संस्थेचे संचालक रविंद्र रकटाटे यांनी मानले.

नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *