जामखेड येथील समर्थ हॉस्पीटल चे संचालक डॉ भरत पोपट दारकुंडे यांना एन् टी व्ही न्युज मराठीचा महागौरव पुरस्कार जाहीर 12 ऑगस्टला नगर येथे होणार पुरस्कार प्रदान
एन् टी व्ही न्युज मराठी महाराष्ट्र या आघाडी च्या वृत्त वाहीनीच्या च्या 23 व्या वर्धापन दिना निमित्त दर वर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या निवडक व्यक्तीना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दरवल घेऊन त्यांना एन् टी व्ही न्युज मराठी महाराष्टाचा महा गौरव या पुरस्काराने वर्धापन दिनी मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करून पुरस्कार दिला जातो या पुरस्कारा साठी या अगोदरच जामखेड येथील वैद्यकीय क्षेत्रासह शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे डॉ संजय मुरलीधर भोरे यांची पुरस्कारासाठी निवड झालेली असून आता याच जामखेड शहरातील समर्थ हॉस्पीटलचे संचालक तथा कोरोना काळात ज्यांनी उल्लेखनिय काम करून अनेकांचे प्राण वाचवण्याच्या कामा बरोबरच सामाजिक बांधीलकी जोपासत आजही अनेक गोरगरीब गरजु रुण्णाची अल्पदरात सेवा करत त्यांना नव जीवन संजीवनी देण्याचे काम करणारे डॉक्टर भरत पोपट दारकुंडे यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना एन टी व्ही न्युज मराठी च्या वतीने महाराष्ट्राचा महागौरव हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांना येत्या 12 ऑगस्ट रोजी अहिल्या नगर येथे या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असल्याचे अधिकृत पत्र एन टी व्ही न्युज मराठीच्या वतीने त्यांना देण्यात आले आहे तसेच या पुरस्कारा साठी त्यांची निवड झाल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी सह वैधकीय क्षेत्रातील डॉक्टर राजकीय सामाजिक अध्यात्मीक क्षेत्रातील मित्र कंपनीने त्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124