कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे
तालुक्यात युरिया खतांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे कृषी सेवा केंद्रांमध्ये खत उपलब्ध असून बुकिंग असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे आता कृषी विभागाने साठे बाजारांवर कारवाईची अशी मागणी होत आहे. तालुक्यात व ग्रामीण भागातील कृषी केंद्रांवर युरिया खतांचा तुटवटा निर्माण झाला आहे. कोरपणा तालुक्यातील सर्व कृषी केंद्रांवर युरिया खतांचा तुटवटा असल्याने शेतकरी चांगलाच त्रस्त झाला आहेत यंदा वरून राजाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे त्यामुळे खर्च करून शेतकऱ्यांनी खरीपंची पेरणी केली आहे. परंतु ऐन वेळेतच पिकांना टाकण्यासाठी खते मिळेनाशी झाल्यामुळे ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी केंद्रांवर भटकती करावी लागत आहेत व्यापाऱ्यांनी युरिया खतांची साठेबाजी सुरू केली की नैसर्गिक टंचाई आहे असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे कोरपणा शहरात व ग्रामीण भागातील दुकानदारांमध्ये युरियासह इतर खतांसाठी टूटवटा निर्माण झाला आहे चढ्या दराने खते विकण्यासाठी व्यापारी खतांची साठेबाजी करत असल्याची चर्चा सध्या परिसरात आहेत कोरपणा तालुक्यातील बहुतांश ठिकाणी अशीच टंचाई निर्माण झाली असून कृषी विभागाने त्यांच्यावर वेळेत दखल घ्यावी अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटी कोरपणा च्या वतीने पल्लवी आखरे तहसीलदार कोरपना यांच्याकडे निवेदन देऊन केली. कृषी केंद्रांवर स्टाक किती आहे कुठे आहे त्यांची माहिती घेऊन सामान्य शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ कोरपना तालुक्यात युरिया खताचा बफर स्टॉक किती आहे व कुठे आहे याची माहिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदन सादर करताना उत्तम पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी कोरपना श्याम रणदिवे माजी सभापती प स कोरपना संभाजी कोवे माजी उपसभापती प स कोरपना भाऊराव चव्हाण उपाध्यक्ष खरेदी विक्री ससहकारी संस्था कोरपना यादव दरने माजी उपसरपंच घनश्याम नांदेकर माजी सरपंच शंकर पेचे माजी सरपंच विलास आडे माजी सरपंच अनिल गोंडे माजी उपसरपंच रोशन मरापे सरपंच व इतर मान्यवर उपस्थितीत होते.