कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपणा नगरपंचायत चे यमाजी धुमाळ मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू कोरपणा शहरातील नव्याने सुरू होणाऱ्या देशी दारू दुकानाला मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली एनओसी रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पद्माकर मोहितकर यांनी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे. कोरपणा शहरात देशी दारू दुकान थाटण्यासाठी कोरपणा नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांनी कोणतेही सभा न घेता किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पूर्व कल्पना न देता काही कर्मचाऱ्यांच्या हाताशी धरले तसेच संबंधित दारू दुकानांशी आर्थिक व्यवहार करून ना हरकत प्रमाणपत्र दिले परंतु ही बाब जेव्हा ग्रामस्थांच्या व काही लोकप्रतिनिधीच्या लक्षात येताच तेव्हा त्यांनी या प्रकरणाची शहानिशा केल्याने मुख्याधिकऱ्यांचा हा पराक्रम समोर आला एनओसी रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे मागणी केली परंतु त्यावर कोणतेही कारवाई न झाल्याने कोरपणा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष पद्माकर मोहितकर व महिलेच्या सुरक्षितेसाठी विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ नये संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज 28 ऑगस्ट रोज ला सकाळी अकरा वाजता कोरपणा बस स्थानक चौकांपासून तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला व तहसील कार्यालयाच्या कार्यालयाच्या गेट समोर उपोषण सुरू केले. एनओसी निकर्षानुसार नाही एनओसी संदर्भात कोणत्याच निकर्षांची पूर्ततां न करता मुख्याधिकाऱ्यांनी सर्व नियम निकष धाब्यावर बसवून नियमबाह्य पद्धतीने या देशी दारू दुकानाला एनओसी दिली आहे ती रद्द करण्यासंदर्भात हे उपोषण सुरू केले संबंधित विभागणीत तात्काळ यावर कारवाई न केल्यास कोरपणा शहरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन उपोषणे करू असा इशारा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नीलकंठ राव कोरंगे यांनी दिला कार्यकर्त्यांनी यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

देशी दारूच्या ना हरकत प्रमाणपत्र करिता अण्णा त्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महाराष्ट्र प्रदेश सहसचिव अबिद अली यांनी जाहीर पाठिंबा दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *