नळदुर्ग, धाराशीव :
जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नळदुर्ग येथील एन.टी.व्ही. न्यूज मराठीचे पत्रकार आयुब शेख यांनी रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

आयुब शेख यांनी यापूर्वीही अनेक वेळा रक्तदान केले आहे, तसेच त्यांनी नेत्रदानाचीही नोंदणी केली आहे. त्यांनी आता पुढील काळात तब्बल १०० वेळा रक्तदान करण्याचा संकल्प केला असून, त्यांच्या या प्रेरणादायी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा कार्यक्रम धाराशिव येथे शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी ‘युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, उस्मानाबाद’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजाचे धर्मगुरू आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एनटीव्ही न्यूज मराठी, नळदुर्ग, धाराशिव.