नळदुर्ग (प्रतिनिधी) :
गणेशोत्सव प्रदूषणमुक्त व आरोग्यदायी पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी नळदुर्ग पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी गणेश भक्तांना विशेष आवाहन केले आहे.

“गुलालामुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम व पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी यावर्षी गुलालाऐवजी फुलांची उधळण करून गणेशाची आरती करावी,” असे आवाहन यादव यांनी केले.

गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती व सामाजिक ऐक्याचा उत्सव असल्याचे सांगून त्यांनी पुढे म्हटले की, “स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेचा विचार करता फुलांची उधळण केल्यास उत्सव अधिक सुंदर आणि पर्यावरणपूरक ठरेल.”

नळदुर्ग परिसरातील गणेश मंडळे व भाविकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून हा संदेश गावोगावी पोहोचवावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *