अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फक्राबाद शिवारात सापळा रचून ट्रॅक्टरसह वाळू माफियाला पकडले.
ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
चालक-मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा दाखल; जामखेड पोलीस करत आहेत पुढील तपास.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि समीर अभंग, पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, लक्ष्मण खोकले, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, भाऊसाहेब काळे यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाला अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले.
वरील पथक दिनांक 30/11/2025 रोजी पहाटे जामखेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना त्यांना आरणगाव ते हाळगाव रोडने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गौणखनिज वाळू भरून चोरून चौंडीवरून हळगाव मार्गे फक्राबादकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ फक्राबाद गावाचे शिवारामध्ये हॉटेल मामाश्री जवळ जाऊन सापळा रचून थांबले असता, बातमीतील वाहन येताना दिसले. त्यावेळी पथकाची खात्री झाल्याने पथकाने नमूद ट्रॅक्टर थांबवून खात्री केली असता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये वाळू भरलेली असल्याचे दिसून आले.
पथकाने ट्रॅक्टर चालकास त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) रविंद्र उर्फ राम बाबासाहेब उबाळे वय २६ वर्षे, रा. चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर असे असून चालक-मालक मी स्वतः असल्याचे सांगितले. त्याला सदर वाळू वाहतुकीबाबत परवाना आहे काय? याबाबत विचारले असता त्याचेकडे कोणताही परवाना अगर रॉयल्टी पावती नसल्याचे त्याने सांगितले.
ताब्यातील इसमाचे कब्जातून 10,000/- रुपये किमतीची ०१ ब्रास वाळू व 5,00,000/- रुपये किमतीची ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण 5,10,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोना/१५६६ शामसुंदर अंकुश जाधव नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. ६३६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
प्रतिनिधी,
एनटीव्ही न्यूज मराठी,
अहिल्यानगर
