औरंगाबाद : दिनांक ४/ डिसेंबर २०२१ रोजी शुर क्रांतिविर तंट्या मामा यांचे बलिदान दिन महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद मुख्य कार्यालय औरंगाबाद शाहा नगर बिड बायपास सातारा परिसर येथे महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तड़वी भिल्ल विकास परिषदेच्या वतीने तंट्या मामा ( भिल ) यांच्या प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषदचे प्रदेश अध्यक्ष अफसर तड़वी, सचिव महम्मद तड़वी, प्रदेश उपाध्यक्षा शमा बरडे , सहसचिव बाबू तड़वी ,कोषाध्यक्ष सांडू तड़वी , कोरकमिटी सदस्य प्रशान्त शास्री आणि इतर संघटनेचे पदाधीकारी उपस्थित होते तंट्या मामा यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले
कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष अफसर तड़वी यांनी तंट्या मामा यांच्या बलिदान व त्यांनी केलेल्या आदिवासी समाजाला केलेली मद्त व देशासाठी आणि समाजासाठी दिलेले बलिदान या विषयी माहिती दिली अफसर तडवी यांनी तंट्या मामा यांच्या विषयी असे सांगितले साधं सरळ आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या तंट्या मामाला, सामान्य माणसाला ओरबाडून खाणाऱ्या इथल्या जमीनदार-सावकार व यांच्या सोयीनं धोरण घेणाऱ्या ब्रिटिश सरकारनं खोटे आरोप करीत पुन्हां पुन्हा आरोपींच्या पींजऱ्यात उभं केलं. उत्पन्नाची साधनें आपल्या हाती बळकावत ठेवून संपत्तीच्या जोरावर समाज व्यवस्थेवर वर्चस्व असणाऱ्या जमीनदार-सावकार व व्यापाऱ्यांच्या विरोधात, त्या काळीही ब्रिटिश सरकार सहसा जात नव्हते कारण त्यांचा उद्देश इथल्या प्रस्थापिताना हाताशी धरून राज्य करणे हाच होता मग त्यासाठी सामान्य जनतेचे हाल झाले तरी त्यांना काही फरक पडत नव्हता ईथल्या जुलमी समाज व्यवस्थेतून – शासन व्यवस्थेतून होरपळून निघालेल्या तंट्या मामानं जमीनदार-सावकार व व्यापाऱ्यां विरुद्ध लढा उभा केला.या प्रसंगी हा लढा ब्रिटिश सरकारच्याही विरुद्ध गेला. ब्रिटिश सरकारने आपले राज्य विस्तार करतेवेळी गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेशच्या सातपुडा पर्वत रांगेत आदिवासी विरुद्ध जुलमी धोरण राबवलेच, पण त्याच बरोबर जमीनदार, सावकार, व्यापारी यांनीही आदिवासी चे शक्य तितके शोषण केले हे तंट्या भिल यांना हा अन्याय अत्याचार सहन झाला नाही आणि त्यांनी या जुल्मी ब्रिटिश शासना विरुध्द लढा दिला आणि सर्व सामान्य जनतेला आदिवासी समाजाला न्याय हक्क मिळुन दिला शुर क्रांतिवीर तंट्या मामा ( भिल ) यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्या कार्याला माझा सलाम असे प्रतिपादन प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांनी केले
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद