जामखेड तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू
निकृष्ट कामाच्या आरोपांनी जामखेड मधील मलनिस्सारण प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्याने जामखेडमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाकडुन जामखेड तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मलनिस्सारण असलेला प्रकल्प टप्पा-१ मधील भ्रष्टाचाराचा आणि निकृष्ट कामाचा पाढा वाचत आज दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बतीने जामखेड तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. ठेकेदाराच्या मनमानी कामाला प्रशासनाचे अभय मिळत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. प्रशासकीय टोकाचे पाऊल आणि परिसर दुर्लक्षामुळे या प्रकरणाबाबत पक्षाच्या वतीने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन कामातील त्रुटींकडे लक्ष वेधण्यात आले होते. मंजूर अंदाजपत्रकातील निकषांचे उल्लघन निकृष्ट साहित्याचा वापर आणि रस्त्यांची झालेली नासधूस यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आठवडा उलटूनही कोणतीही समाधानकारक कार्यवाही न झाल्याने अखेर आज १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून आंदोलकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रमुख आरोप आणि मागण्या ३० वर्षांच्या नियोजनाचा
बोजवारा ही योजना पुढील तीन दशकांचा विचार करून आखली आहे, मात्र सध्याचे काम इतके निकृष्ट आहे की ते काही वर्षेही टिकणार नाही. बोगस कामाचा फटका ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी चालवली आहे. नागरिकांचे हाल अर्धवट सोडलेली कामे आणि खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे जामखेडकरांना नाहक शारीरिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठेकेदाराची चौकशी करा, नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करून कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी ‘जामखेडकरांच्या भविष्याशी खेळू देणार नाही, कामाची चौकशी करावी. उपोषणस्थळी कार्यकर्त्यांनी अशा भावना
व्यक्त केल्या की, हा जामखेडचा प्रकल्प विकासासाठी मैलाचा दगड ठरणार होता, पण ठेकेदाराच्या ‘बोगस कामामुळे ही योजना शहरासाठी डोकेदुखी ठरणार आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष कामात सुधारणा होत नाही आणि दोषींवर कारवाईचे आदेश निघत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या या भूमिकेला शहरातील सर्वसामान्य नागरिकांचाही मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आता यावर तहसीलदार आणि संबंधित विभाग काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शहाजी राळेभात, जेष्ठ नेते
वैजिनाथ पोले, राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, इस्माईल सय्यद, बिभिषण (मामा) धनवडे, वसीम सय्यद, संदीप राळेभात, कुंडल राळेभात, इराफ कुरेशी यांच्यासह मंगेश आजबे, सागर सदाफुले, रमेश आजबे, अवधूत पवार, निखिल घायतडक, संजय डोके, वसीम शेख, नासिर चाचू सय्यद, अमोल गिरमे, अशोक घुमरे, जुबेर शेख, बिलाल शेख, आसिफ शेख, बजरंग डुचे, प्रविण माकुडे, अझहर खान, गणेश हगवणे, अनिल अडाले, सचिन शिंदे, सागर भोसले, अनिल अडाले, दिपक घायतडक, गणेश आजबे, बाळासाहेब खैरे, सलीम शेख, पै. सेफ शेख, दत्तात्रय डिसले, इमरान तांबोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124
