डॉ. विशाल येदवर यांची विदर्भ कबड्डी फेडरेशनच्या सचिवपदी अधिकृत निवड.
अमरावती येथील मोर्शी येथे पार पडलेल्या वार्षिक सभेत सोपवली जबाबदारी.
ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंना नवीन व्यासपीठ मिळण्याची निर्माण झाली आशा.
नियुक्तीनंतर मूर्तिजापुरात उत्साहाचे वातावरण; मित्र परिवाराकडून जल्लोष.
AKOLA | क्रीडा जगतातून मूर्तिजापूर शहरासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. स्थानिक क्रीडाप्रेमी डॉ. विशाल येदवर यांची विदर्भ कबड्डी फेडरेशनच्या सचिवपदी निवड करण्यात आली असून, यामुळे विदर्भातील कबड्डी वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे विदर्भ कबड्डी फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनचे सचिव मा. जितूभाऊ ठाकूर यांच्या हस्ते डॉ. येदवर यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. डॉ. येदवर यांची खेळाप्रती असलेली तळमळ आणि त्यांचे संघटन कौशल्य पाहता, विदर्भातील कबड्डीला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी त्यांची ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
या निवडीचे औचित्य साधून माई बहुउद्देशीय क्रीडा मंडळ, मूर्तिजापूर आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे जल्लोष करण्यात आला. “डॉ. विशाल येदवर यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील गुणवंत कबड्डीपटूंना आता योग्य व्यासपीठ आणि संधी मिळेल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या निवडीबद्दल शेखरभाऊ येदवर, संतोष चौधरी, जावेद खान, दिवाकरभाऊ काटे, पिंटू वानखडे, स्वप्निल जामनीक, शाम येवले, भरत वानखडे, सतीश शेंद्रे, राहुल आष्टीकर, आशिष नवघरे, पिंटू येदवर, गणेश पांढन, दर्शन येदवर, राहुल येदवर, संग्राम येदवर, विनोद गांजाळे, ऋषिकेश शिंदे, मंथन सावळे, अल्बक्ष शाह व समस्त मित्र परिवाराने त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
प्रतिनिधी, मूर्तिजापूर.
