धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे महिला ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेत बचत गटाला प्राधान्य, गावठी दारूबंदी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे तीन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.

गावाच्या विकासासाठी येणाऱ्या निधी आणि योजनांमध्ये बचत गटातील महिलांना प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. कुटुंबे उद्ध्वस्त होऊ नयेत यासाठी गावठी दारू पूर्णपणे बंद करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.

तसेच कोणत्याही विभागाचा कर्मचारी असो, त्याने मुख्यालयी म्हणजेच गावात राहावे, अशी तंबी देण्यात आली. सेवा तत्परतेसाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे सांगण्यात आले.

या महिला ग्रामसभेला माजी जिल्हा परिषद सदस्या लताताई पुनघाटे, प्रशासक सरपंच शिवप्रसाद गवरणा, ग्रामपंचायत सदस्य आणि बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *