चितोडा येथील भाजपाचे कार्यकर्ते विजय बाळू भारंबे यांची भाजपा यावल तालुका व्यापार आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देऊन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी, भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य हर्षल गोविंदा पाटील, किसान मोर्चाच्या पर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी, रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास चौधरी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, भाजपा यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी, यावल नगर परिषद नगरसेवक उमेश फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक डॉ. निलेश गडे, खरेदी-विक्री संघ संचालक तेजस पाटील, भाजपा यावल तालुका सरचिटणीस भरत पाटील व ज्ञानेश्वर तायडे, भाजपा अनुसूचित जमाती जिल्हा उपाध्यक्ष सतीश कोळी, मनोज कोळी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विजय बाळू भारंबे यांच्या नियुक्तीबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
