यावल तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी स्वतः मोठी राखी तयार करून झाडाला बांधली आणि पर्यावरणासाठी झाडाचे आभार मानले.

दहिगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींनी स्वतः राखी तयार करून झाडाला बांधली. झाड आपल्याला पर्यावरणापासून सहारा देते, यासाठी झाडाला मोठी राखी बांधून त्याचे पूजन करण्यात आले. झाड मोठे असते आणि त्याचे कामदेखील मोठे आहे, म्हणून झाडाचे आभार व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनींनी मोठी राखी तयार करून ती झाडाला बांधली.

यानंतर विद्यार्थ्यांना राखी बांधून भावाला दीर्घ आयुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख विजयकुमार ठाकुर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *