नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील केळवद येथील भिकुलाल चांडक हायस्कूल व रामगोपाल माहेश्वरी उच्च माध्यमिक विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री. प्रशांत पुरी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त 31 ऑगस्ट 2026 रोजी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. जयप्रकाश जी. चांडक होते. यावेळी मुख्याध्यापक श्री. किशोर चौधरी आणि पर्यवेक्षक श्री. अभय गांगलवार प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सत्कारमूर्ती श्री. प्रशांत पुरी सर यांचा संस्थेचे अध्यक्ष श्री. जयप्रकाश चांडक यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच मुख्याध्यापक श्री. किशोर चौधरी यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला.

श्री. प्रशांत पुरी यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव तसेच क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. श्री. प्रशांत चिमणे सर आणि गव्हाणकर सर यांनीही श्री. पुरी यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती दिली.

श्री. गांगलवार सर यांनी प्रास्ताविकातून श्री. पुरी यांनी सेवाकाळात केलेल्या कार्याची माहिती दिली. मुख्याध्यापक श्री. किशोर चौधरी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जयप्रकाश जी. चांडक यांनी मार्गदर्शन करत श्री. पुरी यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मुसळे यांनी केले, तर आभार श्री. ठोंबरे यांनी मानले. यावेळी श्री. ठाकरे, श्री. खार्डे, श्री. वाहणे, श्री. डोंगरे, श्री. कोकोडे, सौ. कोल्हे, सौ. सुपले, सौ. मखे, सौ. वानखेडे आणि श्री. वडगेवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *