- कृषी अधिकारी भरत वारे यांचे निधन
- हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- उपचारादरम्यान डॉक्टरांनी केले मृत घोषित
- यावलमधील खासगी रुग्णालयात उपचार
- जिन्यावरच अचानक कोसळले भरत वारे
- कृषी विभागात हळहळ व्यक्त
JALGAON | यावल तालुका कृषी अधिकारी भरत वामन वारे, वय ५२, यांचा हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. यावल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
भरत वामन वारे यांना शनिवारी रात्री आठ वाजता अचानक छातीत वेदना होऊ लागल्याने ते यावल येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले. रुग्णालयाच्या जिन्यावरून जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळून बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भरत वारे हे अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील बेलापूर गावचे रहिवासी होते. ते यावल येथील तडवी कॉलनीमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या निधनामुळे यावल तालुक्यातील कृषी विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी | यावल
