यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सव आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने श्रीमती सरिता गायकवाड मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.

संस्थाध्यक्ष महेश वाणी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन श्रीमती सरिता गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करण्यात आले. मुख्याध्यापक सुनील माळी यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंकर सोळंकी यांनी केले. त्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

शिक्षणासोबतच संस्कार, परंपरा, आनंद आणि एकोप्याचा संदेश देणारा हा उपक्रम बाल संस्कार विद्या मंदिराच्या शैक्षणिक वाटचालीतील एक सुंदर अनुभव ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *