यावल तालुक्यातील दहिगाव येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी आणि शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहकार्याने दहीहंडी फोडत उत्सवाचा आनंद लुटला.
यावेळी दहीहंडी पूजनाचा कार्यक्रम दिनेश पाटील यांच्या हस्ते, तर प्रतिमा पूजन आशा सूर्यवंशी यांच्या हस्ते पार पडले. विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत दहीहंडी फोडली आणि त्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष आशाबाई सूर्यवंशी, सदस्य कैलास पाटील व दिनेश पाटील, तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील सर, पंकज पाटील, किशोर सिसोदे, सोनाली चौधरी मॅडम, सोनाली साळुंखे, विमल बारेला, रामेश्वरी बडगुजर आणि अंगणवाडी सेविका मदनीस यांनी सहभाग घेतला.
