लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेविरुद्धच्या खटल्यात अ‍ॅड. मीरताज गुलामदस्तगिर शेख यांच्या कायदेशीर युक्तिवादाला यश मिळाले आहे. अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सौ. क. आर. अभंग यांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.

आरोपी सौ. क. आर. अभंग यांच्या विरोधात लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांनी अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात केस नं. SCC 1489/2022 अंतर्गत, ६६ हजार १६८ रुपयांच्या कथित थकबाकीपोटी नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम १३८ अन्वये फौजदारी खटला दाखल केला होता.

या प्रकरणात अ‍ॅड. मीरताज गुलामदस्तगिर शेख यांनी बँकेचे दावे, कागदपत्रे आणि ताळेबंद यांचा सखोल अभ्यास करून बचावाची बाजू मांडली. बँकेने सादर केलेल्या पुराव्यांमधील तांत्रिक त्रुटी आणि कायदेशीर उणिवांवर त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

माननीय न्यायाधीश श्री. जोशी यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचे पुरावे, कायदेशीर बाबी आणि युक्तिवाद यांचा कसून विचार केल्यानंतर फिर्यादी बँकेचा दावा फेटाळून लावत आरोपी सौ. क. आर. अभंग यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता (Acquittal) केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *