आडगाव येथील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या कामकाजाबाबत चौकशी होऊनही कामांमध्ये तफावत असल्याचा आरोप करत आडगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक सुनील पाटील यांनी आज, २२ सप्टेंबर २०२६ रोजी यावल पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामांमध्ये तफावत असल्याचा आरोप असून, चौकशी होऊनही संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी दीपक सुनील पाटील यांनी केली आहे.
“चौकशी होऊनही कारवाई का नाही?” असा सवाल उपस्थित करत मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाची पुढील भूमिका काय राहते आणि संबंधितांवर कारवाई होते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
