३१ डिसेंबरला मांडवा येथे रोजगार मेळावा
यवतमाळ : कोरोनामुळे दोन वर्षांपासून सर्व व्यवहार ठप्प असल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक तरुण,तरुणी शिक्षण घेऊनही आर्थिक बाबीमुळे रोजगारापासून वंचित असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. त्या अनुषंगाने दिग्रस तालुक्यातील मांडवा येथे शुक्रवार, दि.३१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अनेक तरूण – तरुणी जवळ चांगल्या व्यावसायिक शिक्षणाचा डिप्लोमा व डिग्री असून व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तसेच आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य मार्गदर्शन नसल्याने शिक्षण बेरोजगार विवंचनेत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, महामंडळे, बँक यांच्या अर्थ सहाय्याच्या विविध योजनेची माहिती नसल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ग्रामसंवाद सरपंच संघटना, तालुका पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ व ग्रामपंचायत मांडवा यांच्या वतीने दिग्रस तालुक्यातील मांडवा येथे सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात सुशिक्षत बेरोजगारांना रोजगाराच्या नव्याने संधी निर्माण करून व सर्व सदस्य यांचे प्रयत्नातुन व देण्यासाठी परिसरातील विविध बँका, सर्वजातीचे तथा सर्व विभागीय महामंडळे तसेच समस्येचे निराकरण व शंकांचे केंद्र व राज्य शासनाचे प्रतिनीधी म्हणुन अधिकारी वर्ग ही उपस्थित राहुन योग्य मार्गदर्शन व माहिती देणार आहे. व्यवसायासंबंधी आपल्या प्रत्येक निरासन या ठिकणी प्रत्यक्षरीत्या केल्या जाईल. या ठिकाणी रोजगारा संबंधी ” स्वप्न, तुमच्या कल्पना, तुमच्या समस्या घेवुन या ” येतांना आपल्या शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे सोबत आणायला विसरू नका ,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय राठोड, उदघाटक जिल्हाधिकारी अमोल येडगे, मार्गदर्शक ग्राम संवाद सरपंच संघटना संस्थापक अजिनाथदादा धामणे (पाटील), प्रमुख अतिथी तहसीलदार सुधाकर राठोड, महाराष्ट्र सचिव विशाल लांडगे,उपाध्यक्ष प्रमोद भगत, प्रमुख उपस्थिती पं. स.सभापती अनिता राठोड, शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठवकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख,जि. प.सदस्य लखन राठोड, सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे, नगरसेवक सुभाषचंद्र अटल, न.प.उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, जि. प.सदस्य अतिष राठोड, रुक्मिणी उकंडे,पं स सदस्य केशव राठोड, दिपाली लाखाडे,सुलोचना कांबळे, विनोद जाधव, प्रेस क्लब संस्थापक अध्यक्ष बबनराव इंगळे, तालुका पत्रकार संघटना अध्यक्ष मजहर खान, ग्रामीण पत्रकार संघ अध्यक्ष लुकमान खान यांची उपस्थिती राहणार आहे.
दिग्रस रोजगार मेळाव्यासाठी संस्था व महामंडळाचे अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र, विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक, दिग्रस स्टेट बँक ऑफ इंडीया हरसुल/दिग्रस, बँक ऑफ इंडीया , सेंट्रल बँक ऑफ इंडीया लोणी, बँक ऑफ बडोदा, कलगाव यवतमाळ अर्बन सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , मागावर्गीय महामंडळ, म. फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आर्थिक विकास महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ, केंद्र सरकारचे प्रतिनीधी अधिकारी, शबरी आदिवासी अर्थिक विकास महामंडळ, जिल्हा ग्रामोद्योग महामंडळ, जिल्हा कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय यांचे अधिकारी व प्रतिनिधी हजर राहणार आहे.
कर्ज प्रकरणासाठी लागणारे कागदपत्रे शैक्षणिक दाखला,उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो , रेशनकार्डची झेरॉक्स प्रत , व्यवसायासाठी लागणाऱ्या स्थावर मालमत्तेच्या किंमतीचे दरपत्रक (कोटेशन), दुकानाच्या जागेचा पुरावा किंवा भाडे करारपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल , दोन जामीनदार, एक नोकरदार, एक बिगर नोकरदार, जमीनदरांचे प्रतिज्ञापत्र व पगारपत्रक सोबत आणण्याचे आवाहन आयोजक ग्राम संवाद सरपंच विदर्भ संपर्क प्रमुख यादव गावंडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल आडे,तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कुडवे, गंगाधर कोरडे,दीनदयाल चौधरी,सरपंच सुनीता भड यांनी केले आहे.