माजी मंत्री संजय देशमुख यांनी केली मागणी
यवतमाळ : दिग्रस तालुक्यत 28 डिसेंबर रोजी गारपीट, अवकाळी पाऊस, सुसाट वार्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तूर, संत्रा, पपई, हरभरा, मोसंबी पिकाचे अतोनात नुकसान झाले ,परंतु रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनी वरील विश्वास उडाल्यामुळे साधारण 80 टक्के लोकांनी विमा काढलेला नाही व पिक विमा यादीमध्ये पपई सारख्या पिकाचा उल्लेख नाही त्यामुळे झालेले नुकसान पाहता शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी केली आहे

गारपीट होऊन दोन दिवसाचा कालावधी उलटला कृषी विभाग ,व महसूल विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे पाठविला, नुकसानग्रस्त शेत पिकाचे पंचनामे सुरु होणे गरजेचे असतानाही कुठलीही हालचाल होताना दिसत नाही, शिवाय शेतकऱ्यांचे प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी माञ गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही त्यामुळे शासनाने व प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे सर्वेक्षण करून तात्काळ एकरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी शेतकऱ्यांच्या या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी दिला आहे