
औरंगाबाद : बजाजनगरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आई व सावत्र वडिलांसोबत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीची आरोपी अरविंद सदावर्ते रा. दाभा, ता. जिंतूर, जि. परभणी याच्यासोबत ओळख झाली होती. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अरविंदने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करून व्हिडिओ क्लिप तयार केली. ती व्हायरल करण्याची धमकी देत त्याने अनेकदा बलात्कार केला. काही महिन्यांनी मुलगी गरोदर असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने सदावर्तेला जाब विचारल्यानंतर मी मुलीसोबत लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले. गावाकडून आई वडिलांना घेऊन येतो, असे सांगून तो निघून गेला. तो आजपर्यंत परत न आल्याने अखेर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रतिनिधी : अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.