♦️ हातकणंगले तालुक्यात कमी पावसाचा पिकांना फटका

♦️ भात आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

♦️ शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निवेदनात नमूद

♦️ सोनाली सावंत यांची दुष्काळग्रस्त यादीत समावेशाची मागणी

♦️ कृषी अधिकारी स्वप्निल माने यांना निवेदन सादर

♦️ पिकांच्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याची मागणी

KOLHAPUR | हातकणंगले तालुक्यात यंदा कमी पाऊस पडल्यामुळे भात आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हातकणंगले तालुक्यातील पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत यांनी हातकणंगले तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांना निवेदन दिले.
तालुक्यातील पिकांच्या परिस्थितीची पाहणी करून वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
शेती हा ग्रामीण भागातील कुटुंबांचा प्रमुख आर्थिक आधार आहे. त्यामुळे पर्जन्यमान, पिकांची स्थिती आणि पाण्याची उपलब्धता यांचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत, पंचायत समिती सदस्य कपिल पाटील, भरत पाटील, राहुल सावंत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

एनटीव्ही न्यूज मराठी | हातकणंगले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *