♦️ यावलमध्ये २० ऑक्टोबरला भव्य रावण दहन
♦️ श्री व्यास महर्षी मंदिर परिसरात आयोजन
♦️ आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते उद्घाटन
♦️ विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन प्रमुख अतिथी
♦️ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार दसरा सोहळा
♦️ मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मंडळाचे आवाहन

JALGAON | यावल शहरात विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्री व्यास महर्षी मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडणार असून, उद्घाटन आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते होणार आहे.

यावल शहरातील श्री व्यास महर्षी मंदिर परिसरात श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते होणार असून, विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच नगराध्यक्ष छायाताई पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धनंजय चौधरी, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका पाटील, यावल-रावेर तालुका आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार आणि माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, शेतकी संघाचे चेअरमन नारायण बापू चौधरी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, अभियंता जहांगिर तडवी, उद्योजक अभय शेठ देवरे, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, दीपक शेठ वेहेडे, चंद्रकांतदादा देशमुख, चंद्रकांतदादा चौधरी, भगतसिंग पाटील, उज्जैनसिंग राजपूत, आर. डी. पाटील, आकाश चोपडे, हाजी मुस्तुफाखाँ शेठ, शशिकांत अनंत देशपांडे, डॉक्टर शंतनु देशपांडे, नगरसेवक सागर चौधरी, विपुल चौधरी, अभिमन्यू चौधरी, हेमराज (बाळू) फेगडे, एम. बी. तडवी, शरद कोळी, मकसुद शेख, रुबाब तडवी, अतुल भालेराव, हकिम शेठ, पी. एस. सोनवणे सर, जयवंतराव येवले, विलास भास्कर, बोदडे नाना, डॉक्टर युवराज चौधरी, उमेश फेगडे, मुन्ना पाटील, पुंडलिक बारी, अशोक जंगले, कमलाकर घारू, सुनील शेठ नेवे, स्वप्नील देवरे, नितीन महाजन, पराग सराफ, दिलीप वाणी, जगदीश कवडीवाले, शिवा शेठ आणि योगेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रावण दहनाचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, यावल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *