दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कला परिसंस्थेतील नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आता पूर्णपणे माफ होणार असून, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याची घोषणा केली आहे.
दुष्काळग्रस्त भागातील कला परिसंस्थांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या सर्व नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.
विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये आणि शेतकरी व कष्टकऱ्यांच्या पाल्यांना दिलासा मिळावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
या शुल्कमाफीचा लाभ केवळ नियमित विद्यार्थ्यांना मिळणार आहे. बाह्य (External), ATKT आणि रिपीटर विद्यार्थ्यांना ही सवलत लागू नसेल. तसेच शहरात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या पाल्यांना केवळ गावात शेती आहे म्हणून लाभ मिळणार नाही.
महाडीबीटी योजनेंतर्गत यापूर्वी ५० टक्के शुल्कमाफी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे उर्वरित ५० टक्के परीक्षा शुल्कही शासन माफ करणार आहे.
या निर्णयासाठी शासनावर सुमारे २० लाख ३८ हजार रुपयांचा आर्थिक खर्च अपेक्षित असून, दुष्काळग्रस्त भागातील कला विद्यार्थ्यांना यामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
