जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कोळवद शिवारात गट क्रमांक ५६६ मधील सात बिघे क्षेत्रातील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाला. या आगीत शेतकरी चंद्रकांत इच्छाराम राणे (रा. बामणोद, ता. यावल) यांचे सुमारे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


सोमवारी रात्री अचानक उसाच्या पिकाला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण शेताला वेढा घातल्याने उभा ऊस काही वेळातच जळून खाक झाला.
घटनेची माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब बोलावण्यात आला. मात्र, आगीची तीव्रता प्रचंड असल्याने अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता.


वर्षभराच्या मेहनतीने उभे केलेले पीक डोळ्यांदेखत जळून गेल्याने शेतकरी चंद्रकांत राणे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
या घटनेप्रकरणी चंद्रकांत राणे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात आग लागल्याची नोंद करण्यात आली आहे.


पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी करीत आहेत.


#Yawal #Jalgaon #Kolwad #SugarcaneFire #FarmerLoss #ऊसजळीत #शेतकरी #शेतकरीनुकसान #यावल #जळगाव #MaharashtraNews #NTVNewsMarathi #BreakingNews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *