उस्मानाबाद : नळदुर्ग शहरातील अवैध धंदे खूप वाढले आहेत . आता तर राजरोस आणि उघडपणे शहरातील विविध ठिकाणी ऑनलाइन जुगार लॉटरी ,खेळला जात असल्याने त्याचे अत्यंत गंभीर परिणाम कुटुंबांवर होत आहेत . तरुणांची एक पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे . शहरात ऑनलाइन जुगार उघडपणे सुरू असल्याने तरुणांचे टोळके याच कामात गुंतले आहेत .


लाखो रुपयांचा ऑनलाइन जुगार लावताना मुले पैसे कोठून आणत असतील हा चिंताजनक प्रश्न आहे . अगदी शाळकरी , महाविद्यालयातील मुले देखील ऑनलाईन लॉटरीला बळी पडताहेत . मजूर , कामगारच नव्हे तर शहरातील बड्या , प्रतिष्ठित घरातील मुलेही जुगार मटक्यात अडकल्याचे दिसून येत आहे . हे चित्र अत्यंत गंभीर आहे . या अवैध धंद्यामुळे तरुणांना दारू, गांजा व नशेचे व्यसन लागत आहे . त्यातून घराघरात भांडणे , कलह आणि हिंसेचे प्रकारही दिसून येत आहेत , त्यामुळे पालक वर्ग अत्यंत चिंतेत आहे . हा प्रकार कोणालाही सांगता येत अशा अनेक संसार चकली पासून वाचवायचे असतील तर नळदुर्ग शहरातील ऑनलाईन जुगार तात्काळ बंद करावा या मागणी करता पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आला या वेळेस उपस्थित पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे सचिव सुनील गव्हाणे उपाध्यक्ष आयुब शेख श्रीनिवास भोसले( सर ) कोषाध्यक्ष प्रसिद्धीप्रमुख शिवाजी नाईक ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे सुनील बनसोडे दादासाहेब बनसोडे तानाजी जाधव अजित चव्हाण सोहेब काजी मुजम्मिल शेख आदी पत्रकारांनी निवेदनाद्वारे मागणी केल
प्रतिनिधी आयुब शेख नळदुर्ग उस्मानाबाद