जळगाव जिल्ह्यातील यावल येथे बहुजन समाज पार्टीतर्फे संविधान दिनानिमित्त संविधान जनचेतना अभियानांतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या सभेला बसपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील डोगरे, खान्देश व पुणे झोन प्रभारी राज चव्हाण आणि मिशनरी कार्यकर्ते बिस्मिल्ला खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच जिल्हाध्यक्ष नारायण अडकामोल, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश मेघे, जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष शांताराम जाधव, रावेर प्रभारी राहुल बनसोडे, प्रशांत निकम, सतीश बिर्हाडे, प्रमोद पारधे, शहराध्यक्ष भीमा गजरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मेघे यांनी केले, तर सुशील केदारे यांनी आभार मानले. सभेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *