यवतमाळ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरूवातीच्या शाळांपैकी एक होती.महिलांवर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. अश्या या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191वी जयंती साजरी करण्यात आली.

कु.आस्था आडे हिने वेशभूषा साकारली यावेळी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकत कु.यशश्री रतनवर, कु.अनाया बनगीनवार,कु.शब्दुली गोविंदवार,वेदांत चेके,कु.उर्वशी आडे, कु.विधी जाधव,कु.भार्गवी ओवंडकर या विद्यार्थांनी टाकत त्यांनी केलेल्या महान कार्याची जाणीव करून दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका शेख आबेदा बेगम व उपमुख्याध्यापक शेख शरीफ यांनी पुष्पहार अर्पण केले.वर्ग 5 वी च्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षिका विद्या महेंद्र पुडके यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले..
या प्रसंगी पर्यवेक्षक अनिकेत कोळसे,पर्यवेक्षिका एन.शिरीशा,सीमा मिश्रा सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते..