यवतमाळ : दिग्रस शहरातील अनेक बँक शाखा व्यवस्थापकाने मनमानी कारभार सुरू केल्यामुळे बँ क खाते उघडण्यासाठी नागरिकांना मनस्ताप करावा लागत आहे, त्याच बाबत काही नागरिक व पत्रकाराने सदर बाब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे मांडताच थेट सर्व बँक शाखा व्यवस्थापकांना त्यांनी बँक खाते उघडण्यासाठी सूचना दिल्या,

शहरात स्टेट बँक, विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक ,महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया,बडोदा बँक कार्यरत असून कर्ज वाटपाबाबत शेतकऱ्यांची गावे बँकेला दत्तक स्वरूपात वाटून दिलेली आहे, ठरवुन दिलेली गावे त्याच बँकेतून पीककर्ज उचलु शकेल, परंतु मजूर वर्ग विद्यार्थी ,विद्यार्थिनी व बिगर शेतकरी यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते सक्तीचे केले असताना त्यांना कुठल्याही बँकेत खाते उघडता येत असताना डोकेदुखी कशाला लावून घ्यायची हेच ध्येय समोर ठेवून काही बँकेतील शाखा व्यवस्थापकांनी मनमानी कारभार सुरू केला असून या बँकेमध्ये तुमचे खाते निघत नाही ,असे सांगून विद्यार्थी व नागरिकांना फेटाळून लावल्या जात आहे ही बाब दिग्रस तहसीलचे तहसीलदार सुधाकर राठोड यांचे समोर माडताच खाते काढण्याबाबत व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वेळीच सर्व बँक व्यवस्थापकांना सूचना देऊन गैरसोय ऐकून घेतल्या जाणार नाही असे सुनावले आहे,अन्यथा लेखी पत्र देणार असल्याचे सांगितले आहे