एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित निवडणुका लढवण्याबाबत संकेत दिले जात असताना शिवसेनेने मात्र त्यापासून फारकत घेतल्याचं दिसून येत आहे.
आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली.
नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.
“नाना पटोले स्वबळ म्हणत आहेत, तर शिवसेनाही ‘बळावरच’ लढेल,” असं म्हणत संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.