बुलढाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील कायम चर्चेमध्ये असणारी निमगाव गुरू ग्रामपंचायत सद्यपरिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे मात्र स्वयंघोषित नेत्याच्या स्वार्थी हस्तक्षेपामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.

मागील पंचवार्षिक मध्ये निमगाव गुरू ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती मात्र ग्रामपंचायत सदस्य ऐवजी स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या स्वार्थी हस्तक्षेपामुळे तत्कालीन सरपंच यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, यावेळी त्यांनी निवडणुकीमध्ये नशीब आजमावले मात्र जनतेने त्यांना साथ दिली नाही. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये रामदास गुरव यांच्या नेतृत्वाखालील स्व भास्कर रावजी शिंगणे ग्रामविकास पॅनलचा पराभव झाला होता मात्र यावेळी स्व भास्करराव शिंगणे ग्रामविकास पॅनेलने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सात पैकी पाच सदस्य निवडून आणत ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविला मात्र मागील प्रमाणेच बाहेरून पाठिंबा देणाऱ्या स्वयंघोषित पुढाऱ्याच्या स्वार्थी हस्तक्षेपामुळे ग्रामपंचायतीमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये कायम हस्तक्षेप करून सरपंच व सदस्य यांच्या अधिकारावर स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी गदा आणण्याचे काम केले जात आहे. यामुळे ग्रामपंचायत मध्ये अनेक विकासा ची अनेक कामे प्रलंबित आहे त्यामध्ये मागील कार्यकालात आठ वेळा उद्घाटन केलेली पेयजल योजना रखडलेली आहे. स्वयंघोषित पुढाऱ्याच्या नेतृत्वाला निमगाव ग्रामस्थांसह तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत. ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांनी एकतर्फी निर्णयाला विरोध केला तर लगेच नेतृत्व बदल करण्याची भाषा केली जात आहे, त्यामुळे नेतृत्व बदल होणार की तत्कालीन सरपंच व सदस्य स्वाभिमानाने राहून पक्षबदल करून घेणार की ग्रामस्थांना विश्वासात घेऊन राजीनामा देणार याकडे ग्रामस्थांसह तालुक्यातील सर्व राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष आहे.