बुलडाणा : मागील 6 जानेवारीला पत्रकार दिनीच टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा ईटीव्ही भारतचे पत्रकार वसीम शेख यांना मलकापुर येथील अवैध बायोडिझल माफिया एड.इफ्तेखार शेख यांच्याकडून शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी पत्रकारांच्या एकजुटीने अखेर सोमवारी 10 जानेवारी रोजी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी बायोडिझेल माफिया ऍड इफ्तेखार विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलकापुर एमआईडीसी भागात सुरु असलेल्या अवैध व बनावट बायोडिझेल प्लांटवर मलकापुर एसडीपीओ त्यागी यांच्या पथकाने धाड टाकून 60 हजार लीटर बनावट बायोडिझेल साठा जप्त केला होता.या प्रकरणी संबंधितावर पुढे काय कार्रवाई करण्यात आली? अशी माहिती बुलडाणा येथील ईटीव्ही भारतचे जिल्हा प्रतिनिधि व टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पत्रकार वसीम शेख यांनी मलकापुर तहसीलदार यांच्याकडून बातमी संकलित करण्यासाठी 30 डिसेंबर रोजी मोबाईलद्वारे माहिती विचारली होती.याच कारणावारुन आता आपला पीतळ उघडा पडेल म्हणून बायोडिझेल माफिया एड.इफ्तेखार शेख याने फोन करुण पत्रकार वसीम शेख यांना पत्रकार दिनी 6 जानेवारीला अश्लील भाषेत शिवीगाळ करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. पत्रकार वसीम शेख यांनी त्या दिवशी बुलडाणा शहर ठाण्यात तक्रार दिली असता काय दाखल पात्र स्वरूपाची नोंद करण्यात आली होती.या घटनेची माहिती जिह्यातील सर्वच पत्रकारांना माहिती झाल्यानंतर सगळ्यांनी त्याचा निषेध व्यक्त केला होता.दरम्यान मलकापूर येथील गजानन ठोसर यांनी धमकी देणाऱ्या बायोडीजल माफियाला जाब विचारण्यासाठी फोन केला असता त्यांनाही या बायोडीजल माफिया ऍड इफ्तेखार याने शिवीगाळ करीत धमकी दिली होती

.त्यावरून मलकापूर पोलीस ठाण्यात मलकापूर शहरातील सर्व पत्रकार जमा होऊन त्यांनी देखील ऍड इफ्तेखार यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. दरम्यान सर्व पत्रकारांनी बुलडाणा जिल्ह्यात जमा होत एकजूट दाखवून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिगणें यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.दरम्यान बुलडाणा शहरातील पत्रकारांनी शहर ठाण्यात जाऊन गुन्हे दाखल करण्यासंदर्भात जाब विचारला होता.शिवाय जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी आपल्या स्तरावरून सरकार प्रशासनाला कारवाईसाठी निवेदन दिले होते.अखेर पत्रकारांच्या एकजुटीमुळे सोमवारी 10 जानेवारीला महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था ( हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध) अधिनियम 2017 च्या कलम 4,कलम 294 नुसार आरोपी ऍड इफ्तेखार शेख याच्यावर बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास बुलडाणा उपविभागीय पोलीस अधीकारी सचिन कदम करीत आहे.पत्रकाराला धमकी देणाऱ्या आरोपी ऍड इफ्तेखार ला तात्काळ अटक करण्याची मागणी जिल्ह्यातील पत्रकारांकडून करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *