यवतमाळ : गेल्या अनेक वर्षांपासून दिग्रस तालुक्यातील विकासात्मक कामासाठी, लोकांच्या प्रश्नांना आपल्या लेखनीतून मांडण्याचे कार्य करणारे प्रेस क्लब दिग्रसची नविन कार्यकारणी पत्रकार दिन ६ जानेवारीला घोषित करण्यात आली.

पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा ६ जानेवारी स्मृतीदिन प्रेस क्लब कडून जांभेकर यांच्या स्मृतीचे पुजन व पुष्पहार अर्पण करुन, प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष बबनराव इंगळे यांनी २०२२ या वर्षासाठीची नविन कार्यकारणीची घोषणा केली, यामध्ये प्रेस क्लब अध्यक्ष रामदास पद्मावार, सचिव सुरेंद्र मिश्रा, उपाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाश सातघरे, कोषाध्यक्ष संजय शुक्ला, प्रसिद्ध प्रमुख अभय इंगळे, सदस्य नवल ठोंबे, विष्णुपंत यादव, डाॅ श्रीकृष्ण खोलगडे या पत्रकारांचा प्रेस क्लब मध्ये समावेश करण्यात आला असून  कायदेविषयक मार्गदर्शक म्हणून अॅड सुनिल व्यव्हारे यांची निवडीची घोषणा यावेळी करण्यात आली

. प्रेस क्लब दिग्रसची कार्यकारणीची निवड कार्यक्रम येथील हाॅटेल मनुहार येथे आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाला तहसीलदार सुधाकर राठोड, ठाणेदार सोनाजी आम्ले, मुख्याधिकारी शेषराव टाले या अधिकाऱ्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *